*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कॅमेर्यासोबतच..माझं जगणं..!!*
कॅमेर्यासोबत जगण्याची चढाओढ
पुरती…मला भोवली..
फोकस…करता..करता..
आयुष्याची..सारी वर्षे सरली..!
गृहीत …धरून चाललो
फोटोतल्या सा-यांच नातेसंबंधाला
घेऊनी उडी…सुखाची
वाहिले..अर्थार्जन..छंदाला..!
जादुटोणा केला लेन्समधून
अंधश्रद्धा कॅमेर्याने जपली
अंगात येणारी भूतबाधा
प्रतिबिंबातून माझ्यात शिरली..!
निमित्तापुरतं यजमानपद अभिमानाने
कॅमेर्याने माझ्याकरता ..स्विकारलं
मूठभरांची मक्तेदारी संपवाया
बारा..हत्तीचं….बळं.. दिलं..!
हदयाच्या कपारीत दडलेलं
स्वप्नं…माझे.. उजळले
फ्लॅश ..चमकायचा विसरला
कॅमेर्यानेचं फ्लॅशबॅक..जपले..!!
बाबा ठाकूर
