You are currently viewing कणकवलीत जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून सायकल रॅलीचे आयोजन

कणकवलीत जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून सायकल रॅलीचे आयोजन

कणकवलीत जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून सायकल रॅलीचे आयोजन

कणकवली
जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून कनक रायडर्स सायकल क्लबच्या सदस्यांनी मंगळवारी सकाळी कणकवली शहरामध्ये सायकल रॅलीचे आयोजन केले होते.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सायकलचा वापर जास्तीत जास्त करून इंधनाची बचत व त्याच अनुषंगाने पर्यावरणाची राखण करीत एक प्रकारचा सामाजिक संदेश या सदस्यांनी समाजाला दिला. सायकलिंग चा वापर हा व्यायामाच्या दृष्टीने पण चांगलाच आहे. लहान मुलांनी व तरुण पिढीने मोबाईलच्या जगातून बाहेर येऊन या सायकल चळवळीमध्ये सहभाग घ्यावा व आरोग्यकारक, असे जीवन जगावे असे आवाहन क्लबच्या सदस्यांकडून करण्यात आले.
या रॅलीमध्ये कनक रायडर्सचे मकरंद वायंगणकर, विष्णू रामा गडे, कैलास सावंत, संजय बिडये, यशवंत भोसले, संजय कुमार कदम,डॉ. आबदार पाटील, कौशिक पाटील, वैभव वाघाटे, रविंद्र सावंत, राधिका सावंत, प्रितिश सावंत. दिगंबर आढाव, गणेश शिरकर, निलेश गावकर, जगदीशअनगोळकर सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा