You are currently viewing हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्या वतीने दोन कर्तबगार महीलांचा सन्मान!

हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्या वतीने दोन कर्तबगार महीलांचा सन्मान!

हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्या वतीने दोन कर्तबगार महीलांचा सन्मान!

सौ अर्चना बंगे आणि श्रीम रुपाली देसाई यांचा सन्मान!
अहिल्याबाई होळकर त्रीशताब्दी जयती निमीत्त दरवर्षी पुरस्कार!

कुडाळ (प्रतिनिधी)

हुमरमळा वालावल गावातील बचत गटाच्या माध्यमातून आणि सतत सामाजिक कार्यातुन अग्रेसर असणाऱ्या सौ अर्चना बंगे आणि घरगुती खाद्यपदार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यात विक्री करुन गावातील महीलांना रोजगार देणा-या श्रीम रुपाली ललित देसाई यांचा सन्मान आज हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच श्री अमृत देसाई उपसरपंच सौ रश्मी वालावलकर यांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सन्मानित केले
अहिल्याबाई होळकर त्रीशताब्दी जयंती निमित्त हुमरमळा वालावल गावातील दोन कर्तबगार महीलांचा सन्मान करण्यात येतो त्यात यावर्षीचा मान बचत गटांना बळ देऊन गावातील महीलांना स्वयंरोजगार देणा-या सामाजिक कार्यकर्त्यां सौ अर्चना अतुल बंगे व घरगुती खाद्यपदार्थांना जिल्ह्यात बाजारपेठ निर्माण करुन गावातील महीलांना रोजगार उपलब्ध करणा-या श्रीम रुपाली देसाई यांचा आज ग्रामपंचायत कार्यालयात सन्मान करण्यात आला
यावेळी ग्रामसेविका श्रीम अपर्णा पाटील सरपंच श्री अमृत देसाई उपसरपंच सौ रश्मी वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ हेमांगी कद्रेकर, माजी उपसरपंच श्री स्नेहलदीप सामंत, महीला बचत गटांच्या सी आर पी सौ मानसी वालावलकर, ग्रामपंचायत लिपीक श्री शैलेश मयेकर, अमित बंगे, कु जाई कद्रेकर आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा