*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, निवेदिका, कथाकार पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुलाब*
फुल गुलाबाचे जसे
काट्याकुट्यात नांदते
जणू जगण्याचा मंत्र
दु:खी जीवांना सांगते
कळीतून उमलून
घेते आकार देखणा
कसा शोभून दिसतो
सर्व फुलांचा हा राणा
येवो कोणीही जवळ
याचे हासून पहाणे
ऊन वादळ वाऱ्यात
याचे आनंदी रहाणे
असो गरीब श्रीमंत
भेद कशाचा ना याला
कधी पूजितो देवाला
कधी शृंगारी शवाला
अनुपमा जाधव

