*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*विद्रोह माझ्यातही होता…!!!*
विद्रोह माझ्यातही होता
वणवा माझ्यातही पेटला होता
द्रोह माझ्यातल्या विझवण्याकरता
कृष्ण गांधी बुध्द माझ्यासोबत नव्हता
साचलेला प्राचीन विद्रोह
शस्त्राने मारला गेला नाही
अग्नीगोलात फेकून दिला
तो अग्नीने भाजला गेला नाही..
कठीण वाटेवरची.. माणूसकी
अगदी जवळून मी पाहिली
पूर्ण शुध्दीत स्वेछेने विद्रोहाने
मृत्युदंडाची जागा स्वतः निवडली
ज्ञात-अज्ञातांना वेदना देणारी ही वाट
मरणापेक्षा जगण्याची भीती देणारी
स्वतःचा श्वास आटोपता घेणारी
आपलं मरण दुस-याच्या डोळ्यांत बघणारी……..मी पाहिली
सुटला एकदाचा!म्हणण्यापूर्वीच
विद्रोहानं आपणातून अगोदरचं उठून जाव
अंतिम श्वास कुठे व कसा घ्यावा
ऐतिहासिक सत्याला सामोरं जावं
काळजाच्या तटबंदीला विद्रोहानं उडवायचं असेल …तर..
आरास करून जगायचं नसतं..
कशाला एवढा जीव लावलास
या षंढाना न सांगताच निघून जायचं असतं…
बाबा ठाकूर

