You are currently viewing सिंधुदुर्ग व रत्नागिरी एसटी कर्मचाऱ्यांचा भाजप प्रणित सेवाशक्ती संघर्ष संघटनेत प्रवेश..

सिंधुदुर्ग व रत्नागिरी एसटी कर्मचाऱ्यांचा भाजप प्रणित सेवाशक्ती संघर्ष संघटनेत प्रवेश..

सिंधुदुर्ग व रत्नागिरी एसटी कर्मचाऱ्यांचा भाजप प्रणित सेवाशक्ती संघर्ष संघटनेत प्रवेश..

कणकवली

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी भाजप प्रणित सेवाशक्ती संघर्ष एसटी महासंघामध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओमगणेश निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला.

हा प्रवेश श्री. पिळणकर यांच्या नेतृत्वाखालील घेण्यात आला. यात श्री. रणसिंग, ए. एम. चव्हाण, ए. जी. आंबेरकर, एच. एम. पनवेलकर, एच. एस. खानोलकर, एस. बी. शिरकर, बी. पी. ढेकणे, एस. एल. सांगवेकर, जे. व्ही. जाधव, एस. एस. ओठवणेकर, एस. पी. मापनकर, व्ही. एस. गुरव, एस. आर. कदम, सूर्यवंशी, सांगेलकर, सानप आणि अक्षय मिठबावकर या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रवेश करताना कर्मचाऱ्यांनी सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न भाजप प्रणित सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी महासंघच सोडवू शकतो, असा विश्वास त्यांना आहे. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळू शकतो, या भावनेतून त्यांनी या संघटनेत प्रवेश केल्याचे सांगितले. यावेळी भाजप कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा