कोलगाव येथे भरधाव ट्रक पलटी, चालक सुदैवाने बचावला…
सावंतवाडी
कोलगाव येथील सिमेंट फॅक्टरीसमोर आज सकाळी एक भरधाव ट्रक पलटी झाला. कोल्हापूरहून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना चालकाला डुलकी लागल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि तो पलटी झाला. सुदैवाने या अपघातात ट्रक चालक सुखरूप बचावला असून ट्रकमधील सामानाचेही कोणतेही नुकसान झाले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघात घडला त्यावेळी ट्रकचा वेग जास्त होता. चालकाला डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघातामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता, परंतु स्थानिक नागरिकांच्या मदतीने लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

