You are currently viewing दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 30/05/2025 रोजी शिरगाव, साळशी,कुवळे, हडपिड वालीवंडे,तोरसोळे,चाफेड, सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी 10.00 वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये शिरगाव गावचे सरपंच समीर शिरगावकर, हडपिड गावचे सरपंच सौ.राणे मॅडम,राणे सर,मंगेश धोपटे ,अमित साटम,संभाजी साटम,पवार मॅडम,सुनील तांबे,विजय वटावकर,प्रशांत कदम,दीक्षा परब,, सौ. कुडाळकर,संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, तसेच संस्था कर्मचारी संजना गावडे, प्रणाली शिर्के, विशाखा कासले, दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर व हेलन किलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल शिंगाडे यांनी केले.सूत्र संचलन सुनील तांबे यांनी केले. तसेच संस्थेचे अहवाल वाचन दळवी मॅडम यांनी केले. त्या कॉलेजच्या पवार मॅडम यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व एकजुटीने एकत्र या असे आवाहन केले. तसेच पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयचे अध्यक्ष मा. संभाजी साटम सर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व अशा कार्यक्रमाला एकत्र येऊन सोइसुविधांचा लाभ घ्या व एकमेकांना सहकार्य करा असे आवाहन केले. या कार्यक्रमाला 100 हून अधिक दिव्यांग बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाला मंगेश धोपटे, अमित साटम,
संभाजी साटम, शिरगाव गावचे सरपंच समीर शिरगावकर, प्रशांत कदम, व आदी मान्यवरांचे बहुमोलाचे असे सहकार्य लाभले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने दर्शन येरम यांना व्हीलचेअर देण्यात आली. तसेच संभाजी साटम यांनी सर्व दिव्यांग बांधवांना चहा व नाश्ताची व्यवस्था केली. व संजना गावडे यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा