दोडामार्ग तहसीलदार यांना २ जून रोजी हजर करा…. पालकमंत्री नितेश राणे या़चे प्रांताधिकारी यांना आदेश
दोडामार्ग
गेल्या चार काही महिन्यांपासून दोडामार्ग तहसीलदार रजेवर आहेत. तालुका प्रमुख गैरहजर यामुळे कामे रखडली आहेत. शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख
बाबुराव धुरी यांच्या आवाहनानंतर दोडामार्ग तालुक्यातील भाजपाचे तालुका अध्यक्ष दिपक गवस यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले या नंतर सावंतवाडी प्रांताधिकारी यांना २ जून रोजी तहसीलदार यांना हजर करा अशा सूचना दिल्या आहेत. अशी माहिती दिपक गवस यांनी दिली.
दोडामार्ग तहसील कार्यालयात तहसिलदार गेले चार महिने उपस्थित नाहीत, यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी विविध दाखले आवश्यक असतात त्यातही दिरंगाई होतं आहे, यावर दोडामार्ग भाजपा पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भुमिका घेतं प्रांताधिकाऱ्यांना सक्त सुचना देत तहसीलदारांना कोणत्याही परिस्थितीत कार्यालयात उपस्थित करा असे आदेश दिले, यानंतर २ जुनं रोजी तहसिलदार हे दोडामार्ग कार्यालयात उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले. या अगोदर येथील तहसीलदार प्रकृती अस्वस्थ्यांमुळे रजेवर होते, त्यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने कारभार पाहत होत्या.
यावेळी दोडामार्ग तालुकाध्यक्ष दिपक गवस, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर,युवा मोर्चाचे अंकुश नाईक आदी उपस्थित होते.
शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष बाबुराव धुरी यांनी “दोडामार्ग तहसिलदार दाखवा, ५१ हजार रुपये कमवा” असे आवाहन केले होते, त्यांनतर पालकमंत्री तात्काळ एक्शन मध्ये आले तसेच हा प्रश्न सोडविण्यासाठी भाजपा दोडामार्ग पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली, मात्र कालच्या आवाहना नंतर दोडामार्ग मध्ये कोणती राजकीय धुमाळी पाहावयास मिळते याची उत्सुकता तालुका वासियांना आहे.
