You are currently viewing मला काहीतरी करायचं

मला काहीतरी करायचं

*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, निवेदिका, कथाकार पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

*मला काहीतरी करायचं*

मला काहीतरी करायचं आहे
आदर्श जीवन जगायचं आहे
ज्ञानाचा प्रसार करायचा आहे
सुखी जग बघायचं आहे

स्त्रीची गुलामी घालवायची आहे
छळ तिचा रोखायचा आहे
सन्मान तिला द्यायचा आहे
मला काहीतरी करायचं आहे

 

गरीबांची गरीबी हटवायची आहे
श्रमाची महती पटवायची आहे
दु:खाना दूर करायचं आहे
समाधान जगात भरायचं आहे
मला काहीतरी करायचं आहे

पतीला साथ द्यायची आहे
मुलांचं जीवन घडवायचं आहे
कर्तृत्व गगनाला भिडवायचं आहे
मला काहीतरी करायचं आहे

 

अनुपमा जाधव

प्रतिक्रिया व्यक्त करा