You are currently viewing मानसशास्त्रीय कसोट्यांचा लाभ घेण्याचे आवाहन

मानसशास्त्रीय कसोट्यांचा लाभ घेण्याचे आवाहन

मानसशास्त्रीय कसोट्यांचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामार्फत इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रीय कसोट्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. दि.4 ते 5 जून 2025 रोजी या कार्यालयामध्ये ही सेवा सकाळी 10 वाजता उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य आर.व्ही. कांबळे यांनी केले आहे.

 मार्च 2025 पासून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग, नवनगर वसाहत, गरुड सर्कलजवळ, सिंधुदुर्गनगरी येथे मानसशास्त्रीय कसोट्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील 74 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत याचा लाभ घेतलेला आहे. या कसोट्यांचा उद्देश विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता, अभिरुची, व्यक्तिमत्त्व आणि करिअर निवडीसाठी योग्य मार्गदर्शन करणे हा आहे. ही सेवा पूर्णतः निःशुल्क असून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

अधिक माहितीसाठी वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.एस.एस.माने मोबा.  ८८५५०७३२६९, समुपदेशक भिमराव रामचंद्र येडगे मोबा. ९४२१०७४५८९, ईमेलवर ID-dietsindhudurg@maa.ac.in, वर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा