करूळ घाटात कंटेनरला आग, कंटेनरमधील डोझर मशीन जळून खाक…….
वैभववाडी
करूळ घाटात आज सकाळी एका कंटेनरने अचानक पेट घेतला. या आगीत कंटेनर आणि त्यातील डोझर मशीन पूर्णपणे जळून खाक झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा कंटेनर करूळ घाटातून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. गगनबावडापासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर असताना कंटेनरने अचानक पेट घेतला. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
आगीची माहिती मिळताच ठेकेदार श्री. वेल्हाळ यांनी तातडीने घटनास्थळी पाण्याचे टँकर पाठवले. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सुदैवाची बाब म्हणजे या दुर्घटनेत कंटेनर चालक थोडक्यात बचावला आहे. आगीमुळे कंटेनर आणि त्यातील डोझर मशीनचे मोठे नुकसान झाले आहे.

