You are currently viewing दोडामार्ग येथे”निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबीराचे” रविवार १ जून रोजी आयोजन

दोडामार्ग येथे”निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबीराचे” रविवार १ जून रोजी आयोजन

दोडामार्ग येथे”निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबीराचे” रविवार १ जून रोजी आयोजन

दोडामार्ग

सिंधुमित्र सेवा-सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी
व शिवशक्ती ग्रामविकास बहुद्देशीय मंडळ, झोळंबे
द्वारा आयोजित“निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गरजू जनतेला तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने “निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबीर” आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरात रुग्ण तपासणीसह बरीचशी औषधे देखील मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तरीही आपणांस नम्र विनंती आहे की, आपण या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व आपल्या परीसरातील रुग्णांना देखील या शिबीराचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिबिराचे दिनांक व वेळ, स्थळ

दिनांक – रविवार १ जून २०२५ वेळ – सकाळी ८.०० ते दु. १२.३० पर्यंत
स्थळ – व्यायामशाळा, झोळंबे, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग.

या शिबिरात ब्लडशुगरची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
वय वर्षे ३५ वरील सर्वांनी ब्लडशुगर तपासणीकरीता सकाळी ८.०० वाजतां उपाशीपोटी उपस्थित रहावे.

डॉ. प्रविणकुमार ठाकरे (अध्यक्ष) व समस्त सिंधुमित्र

सदर शिबिरास खालील माननीय तज्ञ डॉक्टर्स आपली सेवा देणार आहेत.
डॉ. शंकर सावंत
M.S. (शल्यचिकित्सक)
जीवनरक्षा हॉस्पिटल, सावंतवाडी

डॉ. चेतन परब M.D. (फिजिशिअन)
परब हॉस्पिटल, माणगांव

डॉ. स्वाती पाटील, M.S. (नेत्ररोग तज्ञ) दृष्टी नेत्रालय

डॉ. विशाल पाटील, M.S. (नेत्ररोग तज्ञ)

डॉ. स्वप्नील परब, M.D. (फिजिशिअन)
आरोग्य सिंधु क्पिनिक, माणगांव बाजार

*संपर्क*.
दिलीप घोगळे – ९४२११९०३२५
मुन्ना गवस – ९४२२५८६०४४
राजेश गवस – ९४२२४३५८७६

दिनांक – रविवार १ जून २०२५ वेळ – सकाळी ८.०० ते दु. १२.३० पर्यंत

प्रतिक्रिया व्यक्त करा