You are currently viewing मी आहे ना…!

मी आहे ना…!

*मी आहे ना…!*
आपल्या आयुष्यात आलेली
माणसं ही काही उगाचं आलेली
नसतात,
प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी
कारण असतं.

कुणाशी तरी काहीतरी,
ऋणानुबंध जुळलेले
असतात.
*नाहीतर सव्वाशे करोड*
*लोकसंख्येच्या देशात नेमक्या*
*याच व्यक्तींशी आपली ओळख का होते.?*
याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही.

जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी,
*कारण आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसे.*

रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो,
*पण मैत्रीच्या नात्यात तसं नसतं…It’s mutual relation…मन जुळलं की मैत्री होते.*

जे बंध खूप स्ट्रॉंग असतात ते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीचं तुटत नाहीत.
*आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्राचे किंवा मैत्रिणीचे ‘मी आहे ना.!’ एवढे शब्द संजीवनी सारखे काम करतात..*
अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं.

*पैशांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे हो…*
*नात्यांनी समृद्ध होणं*
*तितकंच कठीण.*

*❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞*
*संग्रह अजित नाडकर्णु©शुभांजीत श्रृष्टी*

प्रतिक्रिया व्यक्त करा