मालेगांव प्रतिनिधि :
दि.15 मे 2025 रोजी नवी दिल्ली येथे चंद्र गुप्त मौर्य महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात देशातील व विदेशातील अनेक मान्यवर साहित्यिक सहभागी झाले होते.या महोत्सवात अनेक मान्यवर साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले.मालेगाव येथील विख्यात राष्ट्रीय कवी लेखक आणि समीक्षक संजय मुकूंदराव निकम यांनी लिहिलेल्या मेरा भारत या हिंदी काव्य संग्रहातील कवितांची चंद्रगुप्त मौर्य महा महोत्सवात विशेष साहित्य म्हणून दखल घेतली गेली. या महोत्सवाचे अध्यक्ष संस्थापक दिनेश्वर वर्मा यांनी मेरा भारत,सिपाही की कलम, भारत,शिव छत्रपती, शंभू राजा, नरेंद्र मोदी,आदी कवितांचे महोत्सवात वाचन केले.मुख्य अतिथी राम रतन श्रीवास यांच्या हस्ते राष्ट्रकवि संजय निकम मालेगांव जि नासिक महाराष्ट्र, यांना मातृभूमि सेवा सन्मान देऊन गौरविण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी राम रतन श्रीवास यांनी राष्ट्रकवि संजय निकम यांनी समाज आणि साहित्य संस्कृती या क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल कौतुक केले. राष्ट्रीय कवि संजय मुकूंद राव निकम यांचे साहित्य समाजाला दिशा व प्रेरणा देण्याचे कार्य करील असे प्रतिपादन केले. प्रशांत श्रीवास्तव यानी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.मीना तिवारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.आणि कार्यक्रमाच़ा समारोप केला.या महा महोत्सवात नवी दिल्ली येथील व देश विदेशातील साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व रसिकांनी हजेरी लावली.हा भव्य दिव्य चंद्रगुप्त मौर्य महोत्सव मोठ्या थाटामाटात नवी दिल्ली संपन्न झाला.

