You are currently viewing मालवणात उद्या तिरंगा रॅली

मालवणात उद्या तिरंगा रॅली

मालवणात उद्या तिरंगा रॅली

भारतीय सैनिकांच्या पराक्रमाबद्दल आणि सन्मानार्थ रॅलीचे आयोजन

मालवण

भारतातील निष्पाप नागरिकांवर पाक पुरस्कृत भ्याड दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले.

ऑपरेशन सिंदूर मध्ये शौर्य, कौशल्य, अचूकता, समन्वय आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी जगाला आपली ताकद दाखवून देत पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले.

भारतीय सैनिकांच्या या पराक्रमाबद्दल आणि सन्मानार्थ मालवणवासियां तर्फे सोमवारी सकाळी १०.३० वाजता भरड दत्तमंदिर ते मालवण बंदर जेटी मार्गांवर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या तिरंगा रॅलीत सहभागी होऊन भारतीय सैनिकांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करावयाची आहे. आम्ही भारतीय लष्कराच्या सोबत सदैव राहू हा संदेश देण्यासाठी आपण सर्वांनी तिरंगा यात्रेत सहभागी व्हावे. असे आवाहन धोंडू चिंदरकर, विष्णु मोंडकर, राजा गावकर, भाऊ सामंत, संदिप बोडवे, सहदेव साळगावकर यांच्या सह मालवण मधील देशभक्त नागरिकांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा