You are currently viewing आपल्या हक्काचा सन्मान,करायलाच हवे मतदान

आपल्या हक्काचा सन्मान,करायलाच हवे मतदान

*आपल्या हक्काचा सन्मान,करायलाच हवे मतदान*

*बांदा येथे विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृती*

बांदा

लक्षात ठेवा, लक्षात ठेवा ७मे मतदानाचा दिवस लक्षात ठेवा. आपल्या हक्काचा सन्मान करायलाच हवे मतदान .मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो .आपले मत ,आपला हक्क, मतदानासाठी वेळ काढा ,आपली जबाबदारी पार पाडा. अशा प्रकारच्या मतदान जनजागृती विषयी घोषणा देत पी एम श्री जिल्हा परिषद बांदा केंद्रशाळेतील स्काऊट गाईड कब पथकामार्फत विद्यार्थ्यांनीसायखलवरून प्रभातफेरी काढून नागरिकांनी मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावला यासाठी जनजागृती केली.
७मे रोजी होत असलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने वेळात वेळ काढून मतदानाचा पवित्र हक्क बजावून १००टकके मतदान करणारा जिल्हा अशी ओळख व्हावी या हेतूने या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली असल्याचे मत स्काऊटर शिक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी जे.डी.पाटील यांनी केले व्यक्त केले.
या मतदार जनजागृती रॅली व दौडचा शुभारंभ मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक शांताराम असनकर, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, पदवीधर शिक्षिका स्नेहा घाडी,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी,सपना गायकवाड, सुजाता सावंत,स्नेहा कदम यांनी सहभाग घेतला

प्रतिक्रिया व्यक्त करा