उन्हाळी सुट्टी निमित्ताने गेल्या पाच वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी दिनांक १ मे ते १५ जून रोज एक कविता..!
हा उपक्रम सौ.अनुपमा जाधव.दि डहाणू एज्यूकेशन ट्रस्ट संचलित शाळा के.एल.पोंदा.हायस्कूलच्या (उपक्रमशील आदर्श शिक्षिका सामाजिक कार्यकर्ती, ज्येष्ठ साहित्यिका, कथाकार, पर्यावरण प्रेमी) या राबवित आहेत. या उपक्रमाला सोशल मीडिया, व्हाटस् अप, द्वारे त्यांच्या कविता विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाजातील अनेक व्यक्ती कविता वाचून अभिप्राय देत आहेत.म्हणून मला देखील अभिप्राय द्यावासा वाटतो. या उपक्रमामुळे विविध विषयांवरील कविता रोज वाचायला मिळत आहेत. वाचन संस्कृती, विद्यार्थ्यांसाठी चांगले संस्कार, पर्यावरण जनजागृती,अशा विविध प्रकारच्या कविता वाचायला मिळाल्या.
अनुपमा जाधव यांनी वेळात वेळ काढून आपली रोज एक कविता प्रकाशित केली.त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन!व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
यापुढे देखील त्यांनी हा उपक्रम सुरु ठेवावा. यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागली. साहित्य लेखन, वाचन, यातून त्यांना आनंद मिळत आहे.
कविता तुमची वाचून आस.
काहीतरी करण्याचा धरलाय ध्यास.
प्राण्यांची शाळा तर खूपच आवडली.
गाढवाने कधीच निवडणूक नाही लढवली.
घर. कवितेत निसर्गाचा बहर आहे.
घरातली माणसं मात्र एकमेकांपासून दूर आहे.
डहाणूचा सफर अप्रतिम होता.
प्रत्येक गावातला फेरा राजहंसासारखा होता.
मातृत्वाने भरलेली आई शब्दां शब्दांन ओसांडत होती.
ओसाड राणात सुद्धा हिरवी आमराई होती.
शब्दा शब्दात आगळीवेगळी बात आहे.
चांदण्यासारखे शब्द वेचायला मी मात्र दास आहे.
काळ्या फळ्यावरचा खडू पांढऱ्या कागदाला सजवतो.
अनुपमा मॅडमच्या लिखानासाठीच रोज रोज सूर्य उगवतो.
ईश्वर पाटील शब्दगंध
आकाशवाणी खमन सुरत
