You are currently viewing जर पैशाने मत विकत घेता येतात तर मग विकास का आणि कशासाठी करावा अगदी सरळ सूत्र.

जर पैशाने मत विकत घेता येतात तर मग विकास का आणि कशासाठी करावा अगदी सरळ सूत्र.

जर पैशाने मत विकत घेता येतात तर मग विकास का आणि कशासाठी करावा अगदी सरळ सूत्र.

“कुठे नेऊन ठेवली आमची
सुंदरवाडी.!”

सावंतवाडी

एकेकाळी सावंतवाडी शहर हे सुंदरवाडी म्हणून ओळखले जात असे.
असं म्हणतात की परमेश्वराला पहाटे पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजेच आपली ही सुंदरवाडी. परंतु मागच्या काही वर्षांमध्ये या सुंदरवाडीची अवस्था पाहता येथील शहर प्रेमीयांच्या मनाला फार वेदना होत आहेत. ज्यावेळी या शहराचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर करत होते तोपर्यंत सावंतवाडी हे शहर स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळखले जायचे हे कोणीही सांगेल.
पण आज या शहराची अवस्था फार बिक्कट झाली आहे. शहरातील काही वार्ड मधील रस्ते, गटारे, पिण्याच्या पाण्याच्या समस्या व डळमळीत आरोग्य यंत्रणे हे सहजपणे निदर्शनास येतात. आणि याचं खापर येथील प्रशासनाच्या डोक्यावर फोडल जात पण या परिस्थितीला खरे कारणीभूत जर कोण असेल तर, जे आपली मतं विकतात तेच. त्यांच्या मुळेच आजच्या सर्वसामान्य जनतेला सदर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे म्हणून आज दुःखाने म्हणावं लागत आहे…
“कुठे नेऊन ठेवली आमची सुंदरवाडी.”
येथील आपले स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी अगदी सुशाखात शांत झोपले आहे ते आता नगरपरिषद निवडणूक जवळ आली की मते विकत घ्यायला जागे होणार आहे. तोपर्यंत शहरातील सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना व ज्येष्ठ नागरिक पुढाकार घेऊन शहरातील शक्य होईल तेवढ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच सदरच्या परिस्थितीवर आवाज उठवत आहे.
शहरातील काही वार्ड मध्ये रस्त्याची व गटाराची अर्धवट असलेल्या कामांमुळे अपघात होत आहेत आणि येथील सामाजिक कार्यकर्ते त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करत आहे पण याला कारणीभूत कोण? तर याचे उत्तर आहे आपणच कारण आपण यांना निवडून दिलाय म्हणजे आता पाच वर्ष सर्वकाही सहन करावे लागेल. आम्ही सामाजिक कार्यकर्ते या जनतेसोबत आहोतच परंतु प्रश्न असा पडतो की अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या आमच्या सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने वाली कोण असा गंभीर प्रश्न सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी विचारला आहे.

*संवाद मीडिया*

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

दहावी बारावी नंतर काय करायचे!!…

घडवा तुमचे करियर तुमच्या आवडत्या क्षेत्रात…

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*

आजच प्रवेश निश्चित करा.

(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-
१० व १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*

🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

*संपर्क:*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,

*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 7972997567

कृपया पुढील Google form भरावा :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfwnE0gpLfPz2957rmmXllkrueZdpzXE5f0MKnJejNwJikRKg/viewform?usp=header

*जाहिरात लिंक*👇
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा