धामापूर येथे डंपर आणि कार धडकले….

धामापूर येथे डंपर आणि कार धडकले….

कारचे मोठे नुकसान

मालवण
आज गुरुवार दिनांक २८ रोजी सकाळी ११ वाजता मालवण चौके कुडाळ मार्गावर धामापूर येथील उतारावर असलेल्या तीव्र वळणावर डंपर आणि कार मध्ये धडक बसून अपघात झाला.

अपघातग्रस्त डंपर हा कुडाळवरून चौकेच्या दिशेने जात होता त्यावेळी मालवणहुन कुडाळच्या दिशेने जाणारी पर्यटकांची कार या वळणावर येताच दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक बसून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नसली तरी कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा