10 वी परीक्षेचे फॉर्म ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ

10 वी परीक्षेचे फॉर्म ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत सन 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( 10 वी ) परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांना आवेदनपत्रे (फॉर्म) सरल डेटाबेस वरुन नियमित शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी दिनांक 2 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

       या मुदतवाढीनुसार नियमित शुल्साकह दिनांक 26 जानेवारी 2021 ते 2 फेब्रुवारी 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहेत. तर विलंब शुल्कासह दिनांक 3 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2021 पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत. तर माध्यमिक शाळांनी दिनांक 27 जानेवारी 2021 ते 18 फेब्रुवारी 2021 दरम्यान चलन डाऊनलोड करून चलनाद्वारे बँकेत शुक्ल भरावयाचे आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा