You are currently viewing अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा

अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा

भाजपा पडेल मंडल यांचे आयोजन

देवगड :

भारतीय इतिहासात अनेक महान स्त्री व्यक्तिमतवाणी समाजसेवेचे आणि शोर्याचे अजरामर उदाहरण निर्माण केले आहे. त्यापैकी एक महान आणि प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. त्यांचे न्यायप्रिय राज्यकारभार, प्रजेप्रती असलेली तळमळ, तसेच धार्मिक आणि सामाजिक कामामधील सहभाग यामुळे त्या एक आदर्श शासिका आणि जनसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या जीवनातून तरुण पिढीला शौर्य, सेवा आणि श्रद्धेचे मोल शिकण्यासाठी मिळते.

२०२५ हे अहिल्यादेवी होळकर यांचे ३०० वे जन्मवर्षे या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी वर्षाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी पडेल मंडल यांनी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजकार्य,धर्मकार्य आणि न्यायपूर्ण शासन याची त्रिसूत्री अचूकपणे जपणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांचे विचार तरुणांपर्यंत पोहचावे या उद्धेशाने ही स्पर्धा घेतली जात असल्याचे मंडळाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांनी सांगितले.

स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे आहेत.

अहिल्यादेवी होळकर एक आदर्श शासिका आणि जनसेविका

किंवा शौर्य, सेवा आणि श्रद्धेचा संगम अहिल्यादेवी होळकर

वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर किमान ७०० ते ८०० शब्दात स्वहस्ताक्षरात लिहलेला निबंध फणसगाव भाजपा कार्यालयात दि. २९ मे पर्यंत पाठवावा.

सदर तालुकास्तरीय स्पर्धेतील पारितोषिके पुढीलप्रमाणे आहेत.

प्रथम क्रमांक ₹१०००/चषक व प्रमाणपत्र

द्वितीय क्रमांक ₹५००/चषक व प्रमाणपत्र

यादोन्ही विजेत्यांचे निबंध जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाठविले जाणार याठिकाणी विजेत्याला ₹२०२५ व उपविजेता ₹ १७२५ पारितोषिक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत विद्यार्त्यांनी, अभ्यासकणी तसेच साहित्य व इतिहासप्रेमीनी मोठया संख्येने सहभाग घ्यावा ही स्पर्धा अहिल्यादेवी यांच्या विचारांचा व्यापक प्रचार करणारी ठरेलं अशी अपेक्षा संयोजकांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा