करुळ घाटातील दरड हटविल्याने वाहतूकीस मार्ग खुला
वैभववाडी
करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक चार तास ठप्प झाली होती. संबंधित यंत्रणेने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविल्यानंतर वाहतूक पुर्ववत झाली आहे.
रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका करुळ घाटाला बसला. आज पहाटे ५ वा. गगनबावडा पासून १ कि. मी. अंतरावर घाटात दरड कोसळली. हा मार्ग वाहतुकीला बंद झाला. दरम्यान सर्व वाहतूक भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली. चार तासांनंतर दरड बाजूला करण्यात आली. त्यानंतर घाटातील वाहतूक पुर्ववत झाली आहे.
दुपारनंतर लांब पाल्याच्या एसटी ही करुळ घाट मार्गे सुरू करण्यात आल्या आहेत

