सिंधू कन्या स्वानंदी संतोष सावंतला खेलो इंडिया 2025 मध्ये गोल्ड आणि सिल्वर मेडल
सिंधुदुर्ग
सिंधू कन्या असलेली मुळगाव तरळे आणि आजोळ मसुरे गडघेरा येथे तर मुंबई विक्रोळी येथे राहणारी स्वानंदी संतोष सावंत हिने खेलो इंडिया पटना येथे झालेल्या १०० मीटर हर्डल्स अडथळा शर्यती मध्ये १४.६४ सेकंदात पार करून महाराष्ट्राकडून खेळताना सिल्वर मेडल पटकावून महाराष्ट्राचा झेंडा फडकवला आहे.. तसेच
400 मीटर हर्डल्स अडथळा शर्यत रिले मध्ये स्वानंदी सावंत, शौर्यं अंभोरे आणि टीम सहित महाराष्ट्राने 41.71 सेकंदात पार करून *गोल्ड मेडल* फटकावले आहे. सिंधू कन्या स्वानंदी हिने अशा पद्धतीने डबल धमाका केला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 100 मीटर रिले मध्ये
तामिळनाडू 49.41 सिल्वर मेडल,
केरला 49.83 ब्रांच मेडल पटकावले.
राज्य व राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करत स्वानंदी हिने अनेक पदके मिळवली आहेत तिच्या या दमदार कामगिरीच्या जोरावरच तिची खेलो इंडिया मध्ये 100 मीटर आणि 400 मीटर रिले हर्डल्स अडथळा शर्यतीसाठी महाराष्ट्राकडून निवड झाली होती.मुंबई येथे उदयाचल गोदरेज शाळेमध्ये शिक्षण* घेऊन यावर्षी असलेले दहावी बोर्ड परीक्षेमध्ये 92.20 पर्सेंटेज मिळून आपली अभ्यास वृत्तीही दाखवून दिली. खेळाबरोबरच अभ्यासातही स्वानंदी अतिशय हुशार असून मिळालेल्या दहावीच्या परसेंटेज मधून तिने हे सिद्ध केले आहे.
स्वानंदी हिने यापूर्वी अनेक स्पर्धांमधून गोल्ड सिल्वर ब्रांच मेडल मिळवली असून उत्तर प्रदेश अलाबाद मध्ये झालेल्या अथलेटिक्स स्पर्धेत 100 मीटर हर्डल्स महाराष्ट्राचा नेतृत्व करून गोल्ड मेडल नॅशनल 2022 मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धेत ब्रांच मेडल तसेच 2023 मध्ये तामिळनाडू इथे तिने गोल्ड मेडल पटकावले आहे पुणे बालेवाडी आणि डेरवण चिपळूण येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल तिच्या नावावरती आहेत.
सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
