You are currently viewing अवकाळी पावसाचे वैभववाडीत दोन दिवस धुमशान 

अवकाळी पावसाचे वैभववाडीत दोन दिवस धुमशान 

अवकाळी पावसाचे वैभववाडीत दोन दिवस धुमशान

मुसळधार पावसामुळे अंतिम टप्यात असलेल्या आंबा व काजू पिकाला फटका

वैभववाडी
अवकाळी पावसाने वैभववाडी तालुक्यात गेले दोन दिवस धुमाकूळ घातला असून या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अंतिम टप्यात असलेल्या आंबा व काजू पिकाला फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मे महिना म्हटला की लग्नकार्य, इतर कार्यक्रमांची रेलचेल सुरु असून पावसामुळे कार्यक्रमातून व्यत्यय येत आहे.
यावर्षी अगदी मे महिन्याच्या सुरवातीपासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. मे महिण्यात लग्न व इतर व्यक्तीक व सार्वजनिक कार्यक्रमाची रेलचेल असते. यासाठी तालुक्यात मोठया प्रमाणात चाकरमानी दाखल होतात. मात्र सातत्याने पडणाऱ्या या पावसामुळे सर्वांच्या आनंदावर विरजन पडले. त्यातच गेले दोन दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांची परवड होत आहे.
मे महिण्यातच पावसाला सुरुवात झाल्यामुळे तालुक्यात सुरु असलेले तरेळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग व इतर रस्त्यांच्या कामासह काही अत्यावश्यक विकास कामांमध्ये व्यत्य येत आहे.
शेतीची पूर्व मशागतीच्या कामामध्ये सुद्धा या पावसाने अडथळा आणला आहे.त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पावसाळ्यापूर्वी करायची घरांची दुरुस्ती, डागडुजी असेल किंवा लाकूड फाटा, गुरांची वैरण ठेवणे या सर्वच कामांना या पावसामुळे अडथळा निर्माण झाला आहे.गुरांच्या वैरणीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना बेगमची तयारी करण्यास सुद्धा वेळ मिळाला नाही.
सह्याद्री पट्ट्यातील आंबा हा समुद्र किनारपट्टीच्या आंब्यापेक्षा तुलनेने येतो साधारणपणे मे महिन्यात हा आंबा तयार होतो या तयार आंबा पिकाला या अवकाळी पावसाने मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा