पडवे माजगाव पणतुर्ली रस्ता चिखलमय
दोडामार्ग
पडवे माजगाव – कोलझर ते पणतुर्ली हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याऐवजी रस्ता चिखलमय केल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
रस्त्यावरुन पायी चालणे पण धोकादायक झाले आहे. रस्त्यांचे तिन-तेरा झाले आहे. अधिकारी व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याला जबाबदार अधिकारी आहेत.रस्त्यांचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार शिरिष नाईक यांनी केली आहे.
पडवे माजगाव ते कोलझर पंणतुर्ली हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला होता. रस्त्यांच्या कामास सुरुवात करण्यात आली होती.मात्र कामाची मुदत संपली आहे.तरी रस्ता डांबरीकरण झाला नाही.कोलझर ते कुंब्रल पर्यंत रस्ता खडिकरण करण्यात आला.तसेच गटार काम करण्यात आले आहे.मात्र रस्तांचे डांबरीकरण न केल्याने हा रस्ता आता अपघाताग्रस्त बनला आहे. मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता चिखलमय बनला असून.खडि वर आली आहे.त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. यात आतापर्यत साधारण २० जण जखमी झाले आहेत.पायी चालतानाही ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतं आहे. याला या कामाकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी जबाबदार आहेत. कामांचा अनुभव नसलेला ठेकेदार या ठिकाणी काम करत आहे,म्हणून काम वेळेत पुर्ण झाले नाही.त्यामुळे अशा बेजबाबदार ठेकेदारावर कारवाई करावी.तसेच रस्ता सुरक्षीत करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात यावी. वारंवार अपघात होत असल्याने ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे याला संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत.त्यामुळे जखमींना त्वरीत मदत देण्यात यावी. तसेच येथे कायमस्वरूपी ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्यावतीने शिरिष नाईक यांनी दिला आहे.
