You are currently viewing दोडामार्ग वन विभागाच्या कार्यालयात हत्ती पकड मोहीम संदर्भात बैठक संपन्न

दोडामार्ग वन विभागाच्या कार्यालयात हत्ती पकड मोहीम संदर्भात बैठक संपन्न

दोडामार्ग वन विभागाच्या कार्यालयात हत्ती पकड मोहीम संदर्भात बैठक संपन्न

अखेर वन मजुरांना मिळणार ‘विमा कवच’ ; सरपंच सेवा संघटनेचे मागणीला यश

दोडामार्ग

दोडामार्ग वनविभागात सोमवार दि- १९ मे रोजी हत्ती पकड मोहीम संदर्भात बैठक पार पडली, या बैठकीत वनविभागाचे अधिकारी श्री बोराटे तसेच दोडामार्ग वन क्षेत्रपाल वैशाली मंडल यांसह सरपंच सेवा संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस व दोडामार्ग तालुक्यातील सरपंच उपस्थित होते. या वेळी सदर मोहिमेस शासन अनुकूल असून तसा प्रस्ताव सादर केल्याचे व वनतारा या संस्थेच्या व्यवस्थापकांनी या ठिकाणी येऊन हत्ती हालचाली टिपून त्यांचा प्रस्ताव व अहवाल मंत्रालयात सादर केल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. खास बाब म्हणून सरपंच सेवा संघटनेने सुचविलेल्या वन मजु्रांच्या विम्याचा प्रश्न सुटला असून. साधारण १५ लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आल्याचे यावेळी वनविभागाने स्पष्ट केले यामुळे सरपंच सेवा संघटनेच्या लढ्याला यश मिळाले आहे.

यावेळी सध्या नुकसानी कमी व्हावी, जीवित हानी होऊ नये यासाठी हत्ती पकड अभ्यास दौऱ्यावर सुचविण्यात आलेले अनेक उपाय वनविभागा मार्फत राबविले जातं असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दिनांक ०८.०४.२०२५ रोजी अपघाता पूर्वी हत्ती हाकारा गट व कॅम्प मदतनीस मजूर संख्या २४ होती. सदयस्थितीत त्यात वाढ होऊन ५२ झाली आहे. दिवस व रात्रौ गस्तीसाठी दोन स्वतंत्र पथके कार्यरत असतात. प्रत्येक पथकात एक स्थानिक वनरक्षक व ८ ते १० मजूर असतात. पथक प्रमुख व काही उप पथक प्रमुख हत्तीच्या हालचालीवर व निरीक्षणाची नोंद घेतात ही सर्व नोंद हत्ती हालचाल नोंदवहीत घेतली जाते. सर्व नविन व जुन्या गस्ती पथकातील मजूरांना गणवेश व हन्टर शूज देण्यात आलेले आहेत.स्थानिक मजूरांना १५ लाखाची गट विमा योजना लागू करण्यात आलेली आहे, दोन वाहनांवर घोषणासंस्था (Announcement system) बसविण्यात आली आहे.अलर्ट प्रणाली -हत्तीच्या ठिकाणाची माहिती दर तासाला स्थानिक व्हॉटसअॅप ग्रुपवर पाठविली जाते. Text sms अलर्ट – नियंत्रण कक्षाकडून दररोज ५ वेळा हत्तीच्या ठिकाणाची माहिती Sms व्दारे नागरीकांना/शेतक-यांना पाठविली जाते. (स्मार्ट फोन नसलेल्या व्यक्तीसाठी व जिथे कव्हरेज नेटवर्क कमी आहे अशा भागामध्ये या प्रणालीची उपयुक्तता जास्त आहे.),स्पिकर घोषणा संस्था सदर प्रणाली लवकरच पूर्ण करण्याची तजविज ठेवली आहे. वायरलेस संवाद प्रणाली कार्यरत असून यात ४ बेस स्टेशन, २ रिपीटर स्टेशन, २ वाहनांवर बसविलेली यंत्रणा आणि २० वॉकीटॉकी यांचा समावेश आहे. नियंत्रण कक्ष कार्यान्चीत असून त्याचे मुख्य लक्ष हत्ती निरीक्षणांवर आहे. डॉ. गोविंद (वनतारा) यांनी दोडामार्ग येथे ५-६ दिवस मुक्काम करून हत्ती हालचालीचे निरीक्षण केले आहे. त्याबाबतचा अहवाल त्यांचे व्दारे सादर करणेत आला असून सदर अहवाल पुढील कार्यवाहीसाठी वरीष्ठ कार्यालयास सादर करणेत आलेला आहे. हत्ती बाधित क्षेत्रात जनजागृतीसाठी एक ध्वनीफित (Audio clip) तयार करण्यात आली आहे. जनजागृतीसाठी पॅप्लेटस तयार केले असून ते लवकरच वाटण्यात येणार आहे.पिक नुकसानी मध्ये वाढ करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. जन-वन योजनेअंतर्गत हत्ती प्रवण भागातील ग्रामपंचायतीचा प्रस्ताव सादर करणेत आलेला आहे. हत्ती प्रवण क्षेत्रात सोलार लाईट बसविण्यात आलेल्या आहेत.

 

*१५ दिवसात प्रत्यक्ष हत्तीपकड मोहीम न झाल्यास वनविभागात ठिय्या : प्रविण गवस यांचा इशारा*

 

या अनेक उपाय योजना राबविण्यात येतं आहेतच मात्र तरीही १५ दिवसात प्रत्यक्ष हत्ती पकड मोहीम राबविण्यास सुरुवात न झाल्यास वनविभाग कार्यालय दोडामार्ग येथे ठिय्या आंदोलन पुकारण्याचा इशारा सरपंच सेवा संघटना जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांनी दिला आहे.

यावेळी त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष अनिल शेटकर, मोर्ले सरपंच संजना धुमास्कर, घोटगेवाडी सरपंच श्रीनिवास शेटकर, उपसरपंच सागर कर्पे, कुडासे खुर्द पालं सरपंच राजन गवस,पाटये सरपंच प्रविण गवस, राजाराम देसाई, आनंद आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा