स्वस्तिक फाउंडेशन संचालित दिविजा वृद्धाश्रमातील आजी ४सप्टेंबरला अल्पशा आजाराने श्रीमती सुनीता कोटकर आजीचे निधन झाले.आजी निराधार असल्यामुळे त्यांच्या व अंतविधीची जबाबदारी दिविजा वृद्धाश्रमावर होती,अशा वेळेस आश्रमातील कर्मचारी श्रीमती भारती यशवंत गुरव यांनी मी आजीला अग्नी देणार असे सांगितले . भारती हिने आजीची अगदी तिच्या मुली प्रमाणे शुश्रुषा केली .तिने आजी बरोबर घालवलेला काळ व त्यांच्या मध्ये झालेले ऋणानुंध हे अगदी रक्ताच्या नात्याला लाजवणारे आहे.आजच्या काळात जिथे कौटुंबिक नाती टिकाव धरु शकत नाही .पण आश्रमातील या सहवासाने निर्माण झालेले आपले पणाचे नाते हेच श्रेष्ठ मानले जावे व एक गावातील साधारण स्त्री एका मानलेल्या नात्याला दिलेले अंतिम संस्कार ही स्त्री जन्माच्या करून कहाणी पेक्षा समाजाला नवीन दिशा व वाट दाखवणारी आहे.आजीला अखेरचा निरोप देण्याकरिता संस्थेचे संचालक संदेश शेट्ये, दीपिका रांबाडे , सरपंच पंढरी वायंगणकर,कर्मचारी सखाराम कोकरे,अतुल गुरव ,व आजी आजोबा प्रतिनिधी सतेज रणखांबे आदी उपस्थित होते.दिविजा वृद्धाश्रम उपेक्षित निराधार गरीब गरजू लोकांसाठी कार्यरत राहणारी कोकणातील अग्रेसर संस्था आहे.त्यांच्या या माणुसकीच्या सामाजिक कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
असलदेत निराधार आजीचे दिविजा वृद्धाश्रमाने केले अंतिम संस्कार…..
- Post published:सप्टेंबर 5, 2020
- Post category:कणकवली / बातम्या / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments