*”जपलाला कनवटीचा…मालवणी काव्यसंग्रहाचे प्रकाशन”*
*साहित्यिका, अभिनेत्री कल्पना बांदेकर यांचे स्वप्न साकार*
*प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षीय मनोगतातील शब्दफुले*
सावंतवाडी
विकासाची परिभाषा सांगणार काव्य जे मराठीतही नाही ते ‘जपलला कनवटीचा’ या काव्यसंग्रहात आहे. जो विकास निवडून येणाऱ्यांना आणि निवडून देणाऱ्यांना समजला नाही तो कवयित्रीने “इकास” या कवितेतून मांडला आहे. कवयित्रीचा अंतस्वर व्यापक अर्थ सांगणारा, आत्मस्वर प्रामाणिक आहे. भाषा, बोली या भूगोलात ठरतात, बोलीतील बदलास भूगोल कारणीभूत असतो. कवयित्रीने कोणाचेही साहित्य वाचले नसूनही बोलीतील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेत ती जपण्याचं काम केलय. कौतुकाने भारलेल्या शब्दांची ओंजळ रिती करत शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख तथा बोलीभाषा अभ्यासक डॉ. नंदकुमार मोरे यांनी कवयित्री कल्पना बांदेकर यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
कोकण हा महाराष्ट्रातील स्वर्ग आहे, तो जाणण्यासाठी कोकणातील कवींच्या कविता वाचल्या की कोकण समजतो.. मुख्य प्रवाहात असणाऱ्या कवितांचे कवी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. इथे होणाऱ्या सोहळ्यात मिसळावसं वाटत. कारण, ते कायम स्मरणात राहतात. असे कोकणातील कवींबद्दल गौरवोद्गार काढून “जपलाला कनवटीचा” प्रकाशन सोहळा यादगार केला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख तथा बोली भाषा अभ्यासक डॉ. नंदकुमार मोरे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रा.प्रवीण बांदेकर, अजय कांडर, प्रा.डॉ. शरयू आसोलकर, मधुकर मातोंडकर व्यासपीठावर उपस्थित होते.
*कल्पनाचा कल्पनाविस्तार…*
मालवणी बोलायला सोपी असली तरी लिहायला कठीण आहे. आज मालवणीला चांगले दिवस आलेत. माझी नाळ मालवणीशी जोडली गेली आहे. आजकाल कोकणात चित्रित होणाऱ्या मालिका, चित्रपट, सिनेमातली मालवणी भाषा ऐकून कानफटात बसल्यागत वाटतं. तो मालवणीला अपेक्षित असलेला ठसका जपला जात नाही, तर मालवणी न येणाऱ्यांना आणून ओढून ताणून बोलून भाषेची वाट लावली जाते अशी खंत व्यक्त करत बरीच वर्षे कविता लिहून झालीत. परंतु आज अजय कांडर आणि प्रवीण बांदेकर यांच्यामुळे प्रकाशनाचा योग जुळून आला असे सांगताच त्यांचे डोळे भरले. आपण ७५०० मालवणी शब्दांचा संग्रह केला आहे. तो १०००० शब्द संग्रह करण्याचा आपला मानस आहे. लवकरच त्याचेही प्रकाशन होईल. तसेच आपण आजीकडून, आईकडून ऐकलेल्या गोष्टीवरून जवळपास वीस पंचवीस कथा लिहून तयार आहेत त्याचा ‘आजयेच्यो काडयो’ हा कथा संग्रह देखील प्रकाशित करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.
*मान्यवरांची मनोगते चैतन्यमय…*
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी काव्यसंग्रहातील उत्तम बाबींचे कौतुक करून राहिलेल्या उणिवा देखील ज्ञात करून दिल्या आणि समीक्षक कसा असावा याचे उदाहरण दिले. कवयित्री कल्पना बांदेकर यांचे कौतुक करताना त्यांनी “बांदेकर हे नाव मालवणी साहित्यात जोडले गेले आहे असे सांगत पूर्वीपासून बांदेकर आडनावांच्या साहित्यिकांची आठवण करून दिली. दादा मडकइकरांनी मालवणी कवितेचा डंका वाजवला आहे. त्यांच्या कविता लोकगीताच्या जवळच्या आहेत. कल्पना यांच्या कवितांत लोकगीतातील आशय आहे परंतु ती लय नाही. त्यात वेगवेगळी व्यक्तीचित्र आहेत. प्रत्येक कवितेतून एक गोष्ट त्यांनी सांगितली आहे. हे पूर्वीच्या कोणत्याही मालवणी कवितेत दिसणार नाही. ते वेगळेपण कल्पना बांदेकर यांच्या कवितेत दिसतं असे गौरवोद्गार काढले.
डॉ.शरयू आसोलकर यांनी काव्यसंग्रहातील विविध मालवणी शब्दांचा आढावा घेतला. काही कवितांचे आशय वाचून काव्यसंग्रहाचे रसग्रहण केले आणि कवयित्री कल्पना बांदेकर यांच्यावर कौतुकाची थाप दिली. मधुकर मातोंडकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. कल्पना यांची मैत्रीण कवयित्री सरिता पवार यांनी कल्पनाच्या काव्यसंग्रहातील “पाऱ्यावयलो फुटको कोप” ही सामाजिक भेदभाव आणि सोवळेपण यावर भाष्य करणारी कविता सादर केली आणि मैत्रिणीला शुभेच्छा दिल्या. डॉ.ज्योती बुवा तोरसकर यांनी २५ वर्षांपूर्वीच्या आठवणी सांगून कल्पनांचा जुना नाट्य प्रवास डोळ्यासमोर उभा केला. कल्पना यांच्या बहिणी, भाऊ, भाच्या खास कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. त्यांनी देखील मावशीसोबतचा प्रवास वर्णन करून “आम्हाला तिचा गर्व आहे” असे सांगून भावभावनांनी डोळ्याच्या पापण्या ओल्या केल्या. मृणालिनी कशाळीकर, रमेश बोंद्रे यांनीही आपल्या मनोगतातून स्तुतिसुमने उधळली. प्रभा प्रकाशनचे सर्वेसर्वा अजय कांडर यांनी काव्यसंग्रहाचा चार वर्षांपासूनचा प्रवास आणि कल्पनाचा हट्ट यावर भाष्य करत “कवी कधीच कोणाच्या हाताला लागत नाही” असे सांगून कल्पना यांच्या कविता ही त्यांची स्वतःची वेगळी ओळख असल्याचे प्रतिपादन करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन दोन्ही बाजू सांभाळल्या. वैभव खानोलकर यांनी आटोपशीर सूत्रसंचालन करून आपली छाप सोडली.
*”जपलाला कनवटीचा” पाहण्यासाठी उपस्थित साहित्य प्रेमी…👇*
ॲड.पुप्षलता कोरगावकर, मालवणी कवी दादा मडकईकर, कवयित्री संध्या तांबे, कवी विठ्ठल कदम, अनिल जाधव, कुमार कांबळे, कवी मनोहर परब, कवी दीपक पटेकर, कवी रामदास पारकर, बंड्या धारगळकर, कवी प्रकाश तेंडोलकर, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, पत्रकार ओंकार तुळसुलकर, कवयित्री सरिता पवार, मृणालीनी कशाळीकर, डॉ.ज्योती बुवा तोरसकर, कवयित्री प्रज्ञा मातोंडकर, अभिनेत्री प्रतिभा चव्हाण, मेघना राऊळ, कवयित्री स्नेहा कदम, रामा वाडकर, कॉ.संपत देसाई, दिनानाथ बांदेकर, वृषाली सामंत, मित भोगवीर आदींसह बांदेकर कुटुंबिय उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया*
👩🎓👨🎓👩🎓👨🎓👩🎓👨🎓👩🎓👨🎓
*_डी जी बांदेकर ट्रस्ट मध्ये ऍडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा…._*
सावंतवाडीतील प्रसिद्ध डी.जी. बांदेकर ट्रस्ट घेऊन आले आहेत कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या भवितव्यासाठी आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस.. आणि *एक वर्ष फाउंडेशन कोर्स*
_होय… आता चित्रकला शिकण्यासाठी मुंबई पुण्यात जाण्याची गरज नाही…_
_आमच्या संस्थेत या आणि बदलत्या शिक्षणा प्रकारासोबत नवनवीन तंत्रज्ञान आणि कल्पना शिका._
_मुंबई विद्यापीठाचे चार वर्ष डिग्री कोर्स साठी लागणाऱ्या सीईटी परीक्षेविषयी पूर्वकल्पना व सराव होण्याच्या दृष्टीने एक वर्षाचा फाउंडेशन कोर्स_
_यु,आय, यु एक्स सॉफ्टवेअर, ग्राफिक डिझाईन, क्राफ्ट, कॅलिग्राफी, टायपोग्राफी, डुडलिंग,क्ले मॉडलिंग ॲनिमेशन इत्यादी गोष्टी विषय मूलभूत माहिती संधी…_
_👉विशेष म्हणजे फाउंडेशन कोर्स साठी कोणत्याही सीईटी परीक्षेची गरज नाही._
_शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी_
_प्रवेश प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू…_
तसेच कलेची आवड असणाऱ्या सर्वांसाठी दर शनिवार आणि रविवार *आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस*
*(वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेची अट नाही)*
_चला तर मग कोर्ससाठी प्रवेश घ्या आणि छंदासोबत कलेची आवड जोपासा…_
*अधिक माहितीसाठी*👇
*तुकाराम मोरजकर*
*📲9405830288*
*सिद्धेश नेरुरकर*
*📲9420260903*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/166251/
https://www.facebook.com/share/p/1FMLVgkauT/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.
