*शालांत परीक्षेत मिळविले 98.40 टक्के गुण*
कणकवली :
कणकवली येथील पोतदार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कु. सृष्टी संजय सावंत (सांगवे) हिला दहावी शालांत परीक्षेत 98.40 टक्के गुण मिळाले. ती या विद्यालयात तिसरी आली.
भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आणि एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण यांनी या विद्यार्थिनीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी कु. सृष्टी हिचे वडील सांगवे सरपंच संजय सावंत उपस्थित होते.
