देवगड
येथील उमाबाई बर्वे लायब्ररीमध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रथालयाला देणगीद्वारे मिळालेल्या ग्रथाचे ग्रथप्रदर्शन भरविण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन वाडा येथील ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती अनुराधा दीक्षित यानी दीपप्रज्वलन करून केले व सरस्वतीच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण केला. ग्रथालयाचे संचालक सदस्य दत्तात्रय जोशी यानी श्रीमती दीक्षित यांचे स्वागत केले. यावेळी दीक्षित यानी मराठीचे स्थान जगातल्या प्रमुख भाषात पहिल्या १० मध्ये आहे केंद्र व राज्य सरकारने १ ली ते ५ वी पर्यंतचे मातृभाषामध्ये शिकविण्याचे तसेच स्थानिक पातळीवरील कामकाज मातृभाषेमध्ये करावे असे धोरण राबविले आहे. यामुळे मराठी भाषेला चांगले दिवस येतील मराठी भाषेत हजार वर्षापासून उत्तोमात्तम वाडमय निर्मिती होत आहे. मराठी भाषेमधील या विपुल साहित्य भांडाराचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला हवा. मराठी भाषा टिकवायची असेल तर नवीन पीढीबरोबर मराठी भाषेमधून व्यवहार करायला हवे, तसेच त्यांच्या पर्यंत मराठी वाडमय पोचवायला हवे. तरच मराठी भाषेचा उद्धार होईल असे सांगून कवी कुसुमाग्रज व कवी सुरेश भटाच्या मराठीवरील कवितेचा सदर्भ दिला.
ग्रंथालयाचे अध्यक्ष सागर शा. कर्णिक यांनी ग्रथालयाच्या सर्व वाचकांनी जास्तीतजास्त या ग्रथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे श्री. कर्णिक यानी प्रास्ताविक केले व शेवटी मान्यवराचे व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ग्रथालयाच्या उपाध्यक्षा सौ. उत्तरा जोशी सेवक वर्ग व वाचकवर्ग उपस्थित होते.