You are currently viewing कणकवलीतील पोस्ट ऑफिस कंझ्यूमर्स सोसायटी इमारतीत स्थलांतरित..

कणकवलीतील पोस्ट ऑफिस कंझ्यूमर्स सोसायटी इमारतीत स्थलांतरित..

कणकवली​​

गेली ​७० वर्षांहून अधिक काळ​ ​एकाच इमारतीत असलेले कणकवलीतील पोस्ट ऑफिस अखेर कंझ्यूमर्स सोसायटी इमारतीत कॉलेज रोड येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. गेली ​७० वर्षे पटवर्धन चौकानजीक खाजगी मालकीच्या जुन्या इमारती​त​ पोस्ट कार्यालय अवघ्या साठ रुपये भाड्यावर कार्यरत होते. त्या ठिकाणी ओळख सांगताना कणकवली पोस्ट​ ​ऑफिस जवळ अशी सांगितली जात असे. मात्र आता ही ओळख पुसली गेली आहे. कारण भाड्याच्या जागेत असलेले हे पोस्ट कार्यालय कणकवली कंझ्युमर सोसायटीच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आल्याने आता ग्राहकांना पोस्टाच्या कामासाठी नवीन जागेत जावे लागणार आहे. दोन महिन्यापूर्वी पोस्ट कार्यालयाच्या जुन्या इमारतीचे मालक व पोस्टाचे अधिकारी यांची एकत्रित नगराध्यक्षांच्या दालनात बैठक झाली होती. त्यानंतर पोस्ट कार्यालय इमारत मोडकळीस आल्याने ती डागडुजी करण्यासाठी इमारत मालकांनी पोस्ट कार्यालय स्थलांतरित करण्याची मागणी केली होती.​ ​मागील पावसाळ्यात पोस्ट ऑफिसच्या इमारतीची मातीची भिंत कोसळली होती. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याप्रश्नी तोडगा काढत पर्यायी जागेत पोस्ट कार्यालय स्थलांतरण करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार अखेर हे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांच्या या पोस्ट कार्यालयाच्या येथील आठवणी अखेर विस्मृतीत गेल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − eight =