कणकवलीत १८ रोजी नाथपंथीय मार्गदर्शन, वास्तू सल्ला कार्यशाळा.*
कणकवली
गुरुस्पर्श ज्योतिष विद्यालय यांच्यामार्फत रविवार, १८ मे रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नाथपंथीय मार्गदर्शन व ज्योतिष वास्तू सल्ला कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात होणार आहे.
मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आपल्या कोकणातील काही हितचिंतक, मित्रांच्या आग्रहामुळे अशा कार्यशाळा घेण्यात येत असल्याचे गोसावी यांनी सांगितले. त्यानुसार कणकवली येथे रविवार, १८ रोजी ही कार्यशाळा होत आहे. कार्यशाळेला कणकवलीसह जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहून अनुभव घ्यावा.
या अंतर्गत नाथपंथीय पद्धतीने गूढ व ऊर्जात्मक मार्गदर्शन, ज्योतिष व वास्तू विश्लेषण, दिशात्मक दोष, दुरुस्ती व उपाय, विशेष उपचार, ऊर्जा संतुलन तंत्र, वास्तू बांधणे, दिव्य महासिद्धी वनस्पती व रुद्राक्ष याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. गोसावी यांच्या मुलुंड, दादर, चिंचपोकळी, पुणे या ठिकाणीही अशा कार्यशाळा होत असतात. मुंबईत यापूर्वी अनेकांनी या ज्योतिष विद्येचा लाभ घेऊन आपल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करून घेतल्या आहेत. अनेकांना चांगला अनुभव आला असून सर्वांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी गूढ विज्ञान संशोधक ज्योतिषी रुद्रांग त्रिवेणी बाळ गोसावी (९९६९६९१९२०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

