ठाणे :
जळगावच्या सुपरिचित लेखिका कवयित्री शैलजा करोडे यांना नुकतेच नौपाडा ठाणे येथे शब्दसाज साहित्यिक स्नेह मेळाव्यात साहित्य भूषण 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच समाज चिंतामणी प्रतिष्ठान जळगाव येथे आयोजित त्यांना समाज चिंतामणी पुरस्कार 2025 ने गौरविण्यात आले. शैलजा करोडे यांची नुकतीच दोन पुस्तकं 1) माणुसकी—कथासंग्रह 2) हुंकार काळजाचा—कवितासंग्रह प्रकाशित झाले असून आतापर्यंत त्यांची 25 पुस्तकं प्रकाशित आहेत. समाजाच्या सर्व स्तरातून शैलजा करोडे यांचे अभिनंदन होत आहे.