You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- ९८ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- ९८ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- ९८ वे

अध्याय- १७ वा , कविता – २ री

___________________________

शिष्य भास्कराने फार आग्रह केला । हट्ट नाही सोडला ।

स्टेशनावर घेउनी आला । स्वामींना, अकोल्याच्या ।।१।।

 

भास्कराने विनंती स्टेशन मास्तरांना केली । स्वतंत्र डब्याची व्यवस्था केली । सारी खटपट केली । भास्कराने, स्वामींना

मलकापूरी नेण्यासाठी ।। २ ।।

 

गाडी स्टेशनात आली । गोष्ट एक घडली । रिकाम्या डब्यात

नाही बसली । स्वामींची स्वारी ।। ३ ।।

 

योगीराज बसले जाऊन ज्या डब्यात । आधीच स्त्रिया बसलेल्या होत्या त्यात । स्वामीमुर्ती दिगंबर प्रत्यक्षात ।

घाबरून गेल्या स्त्रिया, देती खबर पोलिसात ।। ४ ।।

 

पोलीस आले । अधिकारी ही आले । स्वामींना बोलले।

महाराज नाही भ्याले । अधिकाराच्या बोलण्याला ।।५।।

 

स्टेशन मास्तर ही आले । त्यांनी आदरपूर्वक स्वामींना विनवले । कायद्याचे प्रयोजन पाहिजे जाणले । घडलेल्या प्रसंगाचे ।। ६।।

 

स्वामी डब्यातून उतरले । परी पुढे एक झाले । पोलिसांनी

त्यांचे काम केले । भरला खटला स्वामींवरती ।। ७ ।।

 

श्री स्वामींचे वागणे । कृतीतून त्यांचे सांगणे । समजुनी घेणे।

सार त्यातले ।।८।।

*******************

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

___________________________

कवी- अरुणदास – अरुण वि.देशपांडे- पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा