You are currently viewing भुतलावरचा प्रवासी

भुतलावरचा प्रवासी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भुतलावरचा प्रवासी* 

 

हरतो जरी खेळतो जरा

तुमच्या सोबत वावरतो जरा

 

आनंदी तुम्ही झालात पाहून

आतून सुखावतो जरा

 

जरी मिळते सोबत सुखाची

दुःखात स्वतःला सावरतो जरा

 

फार काळ कोणाला राहायचेय

समाधान आनंदात जगतो जरा

 

अति विचार घात करतात

कुविचारापासून दूर राहतो जरा

 

सत्याचा मार्ग धरला आहे

न्याय मार्गाने चालतो जरा

 

कोणी कसेही वागा कुणाशी

मैत्रीचे नाते जपतो जरा

 

वाटेत भेटले कोणीही वाटसरू

रामराम शामशाम करतो जरा

 

कोण मी, विचारले कोणीही तर

भुतलावरचा प्रवासी सांगतो जरा

 

सहवास सर्वांचा लाभावा म्हणून

हरतो जरी खेळतो जरा

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४२.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा