You are currently viewing राष्ट्रध्वजाची दोरी

राष्ट्रध्वजाची दोरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*राष्ट्रध्वजाची दोरी*

—————————————–

 

“सरपंचपद जिच्या हाती

तिच्याच हाती ध्वजाची दोरी”

पंचायतराज चा हा कायदा

महिलांसाठी आहे खूप भारी

 

” शोभेच्या ” केवळ ” नामधारी ”

म्हणून यांनां खूप हिणवले जाते

” सही ” च्या मालकीणी म्हणून

राजकारणात गणले जाते

 

पुरुष सदस्य तरी कुठे

स्वयंप्रकांशी दिसत आहेत?

नेत्यांचं जुनं धोतरच ते

हुकूम पाळून नेसत आहेत.

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − ten =