सिंधु रत्न योजनेतून लवकरच ३०० दशावतार कलाकारांना पहारावा साठी निधी – प्रेमानंद देसाई
पिकुळे (लाडाचेटेंब) येथील “सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाचा”३ रा वर्धापन दिन उत्साहात
दोडामार्ग
दोडामार्गग तालुक्यासह मुंबई, पुणे या ठिकाणीही या नाट्य कंपनीचा डंका वाजतोय हे महत्वाचे असुन सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाला आपण शुभेच्छा देतो, त्यांच्या वाटचालीस आपली कायम मदत असेल, तसेच सिंधुरत्न योजनेतून दशावतार कलाकारांना त्याचा पहराव देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे, साधारण ३०० कलाकारांचा यामध्ये सामावेश असल्याचे उद्गगार शिवसेना विधान सभा सावंतवाडी मतदार संघ प्रमुख तथा स्नेहबंध गृप चे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी पिकुळे येथे काढले. ते सिद्धिविनायक दशावतार नाटय मंडळाच्या तृतीय वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी व्यसपीठावर प्रेमानंद देसाई यांसह एडवोकेट पी.डी. देसाई, एडवोकेट अनिल गवस, माजी सभापती दयानंद धाउकर,सौनिक बँक अध्यक्ष लक्ष्मण गवस, पत्रकार सुहास देसाई, माजी मुख्याध्यापक संतोष घोगळे, प्रकाश वर्णेकर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रेमानंद देसाई बोलताना पुढे म्हणाले की, कै. रामा उर्फ दादा रत्नु गवस यांच्या कल्पनेतून हे नाट्यमंडळ सुरु झाले त्यांनतर मालक शत्रू गवस, अमित गवस, रत्नदीप गवस यांनी या नाट्य मंडळाचा विस्तार केला, गेली तीन वर्षे अहोरात्र मेहनत केलेल्या या वेलीचा लवकरच वटवृक्ष होईल, कै. रामा रत्नु गवस यांच्या कार्याला ती श्रद्धांजली असेल, केवळ नाट्य प्रयोग करून न थांबता सामाजिक बांधिलकीतून हे मंडळ विविध कार्यक्रम राबवते, सामाजिक हित जोपासण्यासाठी नेहमीच कटीबद्ध आहे हेच या नाट्य मंडळाचे वेगळे असल्याचे यावेळी प्रेमानंद देसाई म्हणाले.
यावेळी दहावीत तृतीय आलेल्या कु. मानसी सुनील गवस, सॉफ्टबॉल प्रकारात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भूमी हनुमंत सावंत हिचा तसेच पत्रकारितेत आदर्श पुरस्कार प्राप्त सुहास देसाई व प्रमोद गवस यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला, तसेच मालक शत्रू गवस यांचा याचं दिवशी म्हणजे १४ मे रोजी वाढदिवस त्यांचाही यावेळी नाट्य मंडळाच्या वाटचालीतमोलाचा वाटा उचलल्या बद्दल तसेच ही लोककला वृद्धिंगत करण्यासाठी हातभार लावत असल्या बाबत विशेष सत्कार करण्यात आला. या नाट्य मंडळाचे संचालक पत्रकार रत्नदीप गवस यांची दोडामार्ग पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली यासाठी त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी उपास्थित मान्यवरांनी आपल्या ओघवत्या शैलीत सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाचे कौतुक करत गौरवॊदगार काढले.
यावेळी सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळातील कलाकारांनी ‘”साक्षात्कार” हा दशावतार नाट्य प्रयोग सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रमोद गवस यांनी तर आभार रत्नदिप गवस यांनी मानले.
