वाणिज्य शाखेतून मैथिली प्रभू प्रथम तर कला शाखेतून नयना मयेकर प्रथम..
मालवण :
स्व. सौ.जयश्री वामन प्रभु कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय काळसे या महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 100% लागला. सातव्या वर्षीही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. वाणिज्य शाखेतून प्रथम कु. मैथली बाळकृष्ण प्रभु 83.33 %, द्वितीय कु.प्रणीता सुधीर खोत 77.83%, तृतीय कु.विशाखा विलास नाईक 77.00% तर कला शाखेतून प्रथम कु. नयना सत्यवान मयेकर 67.50%, द्वितीय कु.नामदेव सत्यवान थवी 61.83%, तृतीय कु. शुभम शाम नेरुरकर 60.83% गुण प्राप्त केले आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, सदस्य, अधिव्याख्याता, विद्यार्थी, पालक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
