You are currently viewing 26 मे ते 31 ऑगस्ट दरम्यान जलयानांना बंदी

26 मे ते 31 ऑगस्ट दरम्यान जलयानांना बंदी

26 मे ते 31 ऑगस्ट दरम्यान जलयानांना बंदी

सिंधुदुर्गनगरी

Inland Vessel Act, 1917 अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व जलयानांना दरवर्षी दि. 26 मे 2025 ते दि. 31 ऑगस्ट 2025 या पावसाळी हंगामात बंदी करण्याबाबत निर्देशित केली असल्याची माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, वेंगुर्ला बंदरे समुह, सिंधुदुर्ग कॅप्टन एस.एस.टी उगलमुगले यांनी दिली आहे.

पावसाळ्याच्या सुरुवाती पासून खराब हंगाम सुरु होणे अपेक्षित असते. त्यामुळे जीवन आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी Inland Vessel Act, 1917 अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व जलयानांना दि. 26 मे 2025 ते दि. 31 ऑगस्ट 2025 या पावसाळी हंगामाच्या कालावधीत वापरास बंदी करण्यास आलेली आहे. तरी सर्व नौका मालकांनी व जलक्रीडा, प्रवासी वाहतूक व्यावसायिकानी नोंद घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा