You are currently viewing बंदरे विकास विभागाचे सीईओ प्रदीप पी. यांनी केली विविध विकास कामांची पाहणी

बंदरे विकास विभागाचे सीईओ प्रदीप पी. यांनी केली विविध विकास कामांची पाहणी

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र सागरी महामंडळ (बंदरे विकास विभाग) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदर खात्यांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार प्रदीप पी. यांनी दौरा करुन जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी देवबाग येथील आशियाई विकास बँक पुरस्कृत महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली. या प्रकल्पांतर्गत नदीकाठच्या गावांचे संरक्षण करणे, मासेमारी बोटींच्या मार्गातील गाळ काढून नॅविगेशन चॅनल मोकळा करणे असे कामे हाती घेण्यात येणार आहेत. या प्रकल्पाला भेट देऊन त्यांनी या कामांची पाहणी केली.

रेडी बंदराला भेट देत या बंदरातून मालवाहतूक वाढवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. वेंगुर्ला येथील नवीन जेट्टी बांधकामांची देखील पाहणी केली. पर्यटनावाढीसाठी वेंगुर्ला येथील हा प्रकल्प उपयुक्त असून यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. मालवण बंदर येथील प्रवासी सुविधांमध्ये कशा प्रकारे सुधारणा करता येईल याबाबत उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्देश दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा