You are currently viewing पिंगुळी येथे 15 मे ला सत्संग सोहळा

पिंगुळी येथे 15 मे ला सत्संग सोहळा

पिंगुळी येथे 15 मे ला सत्संग सोहळा

कुडाळ

श्री काडसिध्देश्वर भक्त मंडळ काळेपाणी पिंगुळी, गवळदेव मित्रमंडळ पिंगुळी आणि प. पू. सदगुरु अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र सिध्दीगिरी संस्थान कणेरी मठ, कोल्हापूर यांच्या उपस्थितीत गुरुवार दि 15 मे 2025 रोजी सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

श्री काडसिध्देश्वर आध्यामकेंद्र, पिंगुळी काळेपाणी, कुडाळ येथे आयोजित केलेल्या या सोहळ्यात सकाळी 5.00 वा. काकड आरती,सकाळी 7 ते 9:30 वा: भजन,सकाळी 10 ते 12:30 वा. महाराजांचे अमृतवाणीतुन प्रवचनाचा लाभ,दुपारी 1:00 वा.आरती, दर्शन, महाप्रसाद अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पिंगुळी भक्त मंडळ तसेच प. पू. सदगुरु अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी महाराज सेवेकरी यांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा