You are currently viewing हॉस्पिटलमध्ये फिजिशियन नाही तो नाहीच आता 108 ॲम्बुलन्सवर डॉक्टर पण नाही काय होणार गंभीर रुग्णांच हा एक गंभीर प्रश्न ?

हॉस्पिटलमध्ये फिजिशियन नाही तो नाहीच आता 108 ॲम्बुलन्सवर डॉक्टर पण नाही काय होणार गंभीर रुग्णांच हा एक गंभीर प्रश्न ?

हॉस्पिटलमध्ये फिजिशियन नाही तो नाहीच आता 108 ॲम्बुलन्सवर डॉक्टर पण नाही काय होणार गंभीर रुग्णांच हा एक गंभीर प्रश्न ?

सावंतवाडी

उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांचा जीव जगवण्यासाठी फिजिशियन हवा आरोग्य यंत्रणे सक्षम असावी याकरिता आंदोलन झाली उपोषणे झाली त्यावर आश्वासनांचा पाऊस पडून आंदोलने – उपोषण वाहून गेली.
आता तर 108 ची सेवा सुद्धा सुरळीत नाही 108 उपलब्ध झाली तर त्यावर डॉक्टर पण नाही एखादा सिरीयस पेशंटला 108 ॲम्बुलन्सची तीन – तीन तास वाट पाहावी लागते अन्यथा प्रायव्हेट ॲम्बुलन्स करून गोवा बांबुळ गाठावी लागते.
सावंतवाडी तालुक्यासाठी 108 वर फक्त एकच डॉक्टर आहे त्याला पण 24 तास ड्युटी करावी लागते त्यामुळे फक्त त्याच्या एकट्यावर ताण पडतो सदर डॉक्टर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व राजू मसुरकर यांना कालच म्हणाले हे काम मी लवकरच सोडणार आहे माझ्यावर खूप ताण पडतो . पहा काय परिस्थिती आहे ती आपल्या उपजिल्हा रुग्णालयाची आणि अजूनही आपण सर्व शांतच आहोत येथे लोकांची जीव जात आहे आणि येथील नेते मंडळी सुशागात आहे त्याचे कारण अगदी स्पष्ट आहे.
जेव्हा येथील काही मतदार एका मतासाठी दोन – तीन हजाराला विकले जातात तेव्हा त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी या विषयावर आमचे कामधंदे सोडून कितींदा आंदोलने आणि उपोषणे करायची आणि कोणासोबत भांडायचं असा थेट प्रश्न रवी जाधव जनतेला विचारत आहे.
आरोग्य विषयक सोयी सुविधा हा गंभीर प्रश्न आता पुन्हा एकदा पाच वर्षासाठी पेंडिंग राहिला आहे हे मात्र आता निश्चित झाले आहे असं म्हणायला हरकत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा