You are currently viewing खडपडे येथे श्री देव मल्लनाथ प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा

खडपडे येथे श्री देव मल्लनाथ प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा

सावंतवाडी :

चौकुळ नजीक खडपडे येथील मल्लनाथ मंदिर येथे श्री देव मल्लनाथ, सातेरी, भावई, भूतनाथ, वेताळ व लिंग सहपरिवार देवता स्थिर प्रतिष्ठा श्री देव मल्लनाथ प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा सोमवार १२ मे ते बुधवार १४ मे या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त मंदिरात सोमवार १२ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी १ प्रायाश्चित्त (खौर), पुण्यहवाचन, जलाधिवास, मंगळवार १३ मे सकाळी ८ ते दुपारी १ प्राकारशुध्दी, मुख्य देवतेची प्रतिष्ठापना, वास्तु, गृहयज्ञ, पर्याय होम, बुधवार १४ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी १ प्राकारशुध्दी, स्थापित देवता पूजन, शिखर स्थापना, देवता स्थिर प्रतिष्ठा, बलिदान, पुर्णाहुती, गाऱ्हाणे, आरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. यादिवशी सकाळी ११: ५० वाजता या शुभमुहूर्तावर कलशारोहण व मुर्तीप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

या धार्मिक सोहळा चौकुळ, कुंभवडे व खडपडे प्रमुख मानकरी, गावकरी व समस्त ग्रामस्थ मंडळी सर्व सिमधडे, बहुमानी, सीमशेजारी, गाव पुरोहित व पुरोहित यांच्या उपस्थितीत होणार आहे. भाविकांनी या प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा