You are currently viewing मातीत मिसळून पुन्हा

मातीत मिसळून पुन्हा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मातीत मिसळून पुन्हा*

 

या सुंदर भूमीवर

यावे वाटते फिरून

थकलेला हा जीव

पुन्हा मातीत मिसळून…

 

निळे नितळ नभांगण

सागर गहिरा निळा

हिरवा निसर्ग सभोवती

आनंद देतो आगळा….

 

पक्षी प्राणी वनस्पती

सौंदर्य डोंगर द-यात

भान हरपत बघावा

सूर्योदय सूर्यास्त नभात…

 

जिव्हाळ्याचे लोकं

आपुलकीचा समाज

उपकार कसे फेडावे

आईबाबांचे या जन्मात…

 

सत्कर्माचे संस्कार शिकलो

याच ना मानवजन्मात

परोपकार सद्भावना

नित्य जागली ह्रदयात…

 

सृष्टीतुझी बघण्या

दिलास जन्म जिथे

भगवंता यावेसे वाटते

मातीत मिसळून येथे…..

 

~~~~🌱~🌹~🌱~~~~

 

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा