सिंधुदुर्ग :
मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार सकाळी 6.30 वाजता ओम गणेश निवासस्थान येथून गोवर्धन गोशाळेकडे प्रयाण सकाळी 6.45 वाजता गोवर्धन गोशाळा येथे आमगन व राखीव सकाळी 8.30 वाजता मोटारीने मालवणकडे प्रयाण, सकाळी 9.30 वाजता राजकोट, ता. मालवण येथे आगमन व राखीव, दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेद्रसिंहराजे भोसले, यांच्या समवेत मराठा साम्राज्य संस्थापक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन समारंभास उपस्थिती (स्थळ : राजकोट, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), दुपारी 12.55 वाजता, मोटारीने टोपीवाला ग्राऊंड, मालवणकडे प्रयाण, दुपारी 1.10 वाजता, टोपीवाला ग्राऊंड, मालवण येथून हेलिकॉप्टरने कणकवलीकडे प्रयाण, दुपारी 1.25 वाजता, गोवर्धन गोशाळा येथील हेलिपॅड येथे आगमन व मान्यवरांच्या स्वागतास उपस्थिती. दुपारी 1.40 वाजता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेद्रसिंहराजे भोसले, यांच्या समवेत गोवर्धन गो शाळेच्या उद्घाटनास उपस्थिती (स्थळ : करंजे-साटमवाडी, ता. कणकवली)