You are currently viewing श्री एकमुखी दत्त मंदिर सावंतवाडी येथे शुक्रवारी श्री टेंबेस्वामी पादुका वर्धापन दिन होणार साजरा

श्री एकमुखी दत्त मंदिर सावंतवाडी येथे शुक्रवारी श्री टेंबेस्वामी पादुका वर्धापन दिन होणार साजरा

सावंतवाडी :

श्री.एकमुखी दत्त मंदिर सबनिसवाडा सावंतवाडी येथे वैशाख शु.१२ शुक्रवार दिनांक 9 मे 2025 रोजी श्री टेंबेस्वामी पादुका मंदिरचा 109 वा वर्धापनदिन साजरा होणार आहे. यावेळी सकाळी 8 ते 9 एकादशमी, अभिषेक, सकाळी 9.30 श्री सत्यदत्त पूजा, दुपारी 12.30 वाजता श्रींची आरती व 1.00 वाजल्यापासून तीर्थप्रसाद, सायंकाळी 7.00 वाजता पालखी सोहळा, आरती व स्थानिक दत्तगुरु भक्तांचा भजनादी कार्यक्रम होणार आहे.

तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक व्यवस्थापन समितीने आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा