*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*“रस महती”*
माणसानं रस घ्यावा सर्व कार्यांत
रसग्रहणाने होई जीवन समृद्धIIधृII
वीररस शांत करूण अद्भुतरस
शृंगाररस हास्यरस प्रेमरस
कला वाचन संगीत घ्यावा रसास्वादII1II
रौद्ररस बिभत्सरस क्रोध टाळावेत
रसना सर्वांनी सदा ठेवावी ताब्यांत
फळ मिळेल रसाळ करिता मशागतII2II
नवरस मधुर गोरस निसर्ग दत्त
कायरस सुधा अन्नरस सेवावेत
काव्य भक्ती नाम घ्यावे शुद्ध रस पानII3II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.