सावंतवाडी:
श्री पंचम खेमराज महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या राजमाता सत्वाशीला देवी भोसले कनिष्ठ महाविद्यालयाने फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या एचएससी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९८.३८% लागला असून, परीक्षेस बसलेल्या २४७ विद्यार्थ्यांपैकी २४३ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे कला शाखेने १००% निकाल नोंदवून आपली श्रेष्ठता सिद्ध केली आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९८.३६% तर विज्ञान शाखेचा निकाल ९८% लागला आहे. महाविद्यालयात विज्ञान शाखेतील कुमारी किंजल अविनाश पै हिने ९१.१७% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर वाणिज्य शाखेतील कुमारी जान्हवी भास्कर मिस्त्री ९०.६७% गुणांसह द्वितीय आणि कुमारी वैभवी रामचंद्र न्हावेलकर ८९.६७% गुणांसह तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.