You are currently viewing पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथे महाराष्ट्र इंजिनीअरिंग वर्क्सच्या सौजन्याने पिकअप शेड…

पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथे महाराष्ट्र इंजिनीअरिंग वर्क्सच्या सौजन्याने पिकअप शेड…

पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथे महाराष्ट्र इंजिनीअरिंग वर्क्सच्या सौजन्याने पिकअप शेड…

कुडाळ

पिंगुळीतील म्हापसेकर- तिठा येथील बस थांब्यावर महाराष्ट्र इंजिनीअरिंग वर्क्स यांच्या सौजन्याने प्रवाशांसाठी पिकअप शेड उभारण्यात आली आहे. या सुविधेमुळे आता ग्रामस्थ आणि नियमित प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पिंगुळीचे सरपंच अजय आकेरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई, विकास कुडाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षा कुडाळकर, पोलीस पाटील सतिश माडये, बाबली पिंगुळकर, वैभव धुरी, ग्रामपंचायत सदस्य मंगेश मसके, शशांक पिंगुळकर, बंड्या पिंगुळकर, मंगेश चव्हाण, पिंगुळी व्यापारी अध्यक्ष सुनील म्हापसेकर, वैभव दाभोलकर, अविनाश वालावलकर, अमित तेंडोलकर, मुश्ताक शेख, आखलाख शेख, विष्णू धुरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

महाराष्ट्र इंजिनीअरिंग वर्क्सचे मुश्ताख शेख यांनी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीबद्दल उपस्थितांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा